Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिप्परगा (रवा) येथील स्तंभाचे पूजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्तंभाचे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१७) पूजन करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ग्रामपंचायत हिप्परगा (रवा), मराठवाडा मुक्तीसंग्राम संयोजन समिती व ग्रामस्थांच्या वतीने येथील स्तंभाचे दर महिन्याच्या १७ तारखेला पूजन करण्यात येते.

\"मराठवाडा\"

सोमवारी (दि.१७) लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते या स्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वग्गे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप, सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच विजय लोमटे, मुख्याध्यापिका कांबळे, स्वामी सर, गोपीनाथ मैंदाड, अजित जाधव, संजय जाधव, बाळु वाघमारे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

\"मराठवाडा\"

Tags: मराठवाडा मुक्तीसंग्राम
Previous Post

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात रुग्णांना फळे वाटप

Next Post

कानेगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपुजन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

कानेगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपुजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!