Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसारच जमिनीचे विभाजन करावे : जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

by admin
in आपला जिल्हा
A A
0

उस्मानाबाद – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे विभाजन करत असताना भविष्यात सहहिश्शेधारकांमध्ये शेतीला येण्या जाण्याकरिता रस्त्याचा प्रश्न उद्भवन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात शेत रस्त्यावरुन भांडण-तंटे, वाद टाळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या दि. 29 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकामध्ये खालील प्रमाणे अधिकचा मजकूर जोडण्यात येत आहे.
धारण जमिनीचे विभाजन करत असताना सहधारकाने अर्जासोबत 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर हक्कसोड पत्र सादर केले असेल अशा प्रकरणात तहसीलदार यांनी सुनावणीच्या वेळेस हक्कसोड करणाऱ्या सहधारकांची ओळखीची आणि त्यांनी दिलेले हक्कसोड हे स्वखुशीने दिले आहे याबाबतच्या सत्यतेची खात्री करुन सदरच्या सहधारकाने हक्कसोड पत्रास मान्यता द्यावी व आदेशात याबाबत स्पष्ट उल्लेख करावा.
सहधारकांनी शेतजमिनीच्या विभाजनाचा प्रस्ताव सादर करत असताना शेतामध्ये जाणे-येण्याकरिता प्रचलित मुख्य वाहिवाटीच्या रस्त्यापासून त्यांच्या प्रस्तावित विभाजनाने तयार होणाऱ्या शेत जमिनीत जाणे-येण्याकरिता रस्त्याच्या उपलब्धतेबाबत स्पष्ट उल्लेख करावा व विभाजनाच्या प्रस्तावासोबत रस्त्याच्या नजरी नकाशा सोबत सादर करावा. यामध्ये रस्त्यांची लांबी, रुंदी व रस्ता कोणत्या क्रमांकाच्या नंबर बांधावरुन जातो याबाबत स्पष्ट उल्लेख करावा.
तहसीलदार यांनी आदेश करताना रस्त्याच्या तपशीलाचा उल्लेख करावा व रस्त्याची नोंद अधिकार अभिलेखाच्या (7/12) इतर सदरावर करावी, तसेच ज्या अर्जात रस्त्याबाबत स्पष्ट मागणी नाही तसे अर्ज 85(2) विभाजनासाठी विचारात घेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादमहाराष्ट्र
Previous Post

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य पाटील यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने जल्लोष

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र (काका) धुरगुडे यांची निवड

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र (काका) धुरगुडे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!