Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीबाई सखी मंच लोहारा यांच्या वतीने बुधवारी (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका शामल माळी होत्या. यावेळी प्रा. डि.एन.कोटरगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विचार मांडले. त्या काळात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींचा सामना करत स्त्री शिक्षणासाठी खूप मोठे कार्य केले. त्यामुळेच तर आज प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. तसेच सावित्रीबाई फुले यांची फक्त जयंती साजरी करून न थांबता त्यांचे विचार समाजातील प्रत्येकाने अंगीकारने आवश्यक आहे असे मत प्रा. कोटरंगे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, अभिमान खराडे, नगरपंचायत गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, माजी जि.प.सदस्या मिराताई माळी, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, माजी सरपंच मुक्ताताई भोजणे, नगरसेविका सुमन दिपक रोडगे, शमाबी शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख परमेश्वर साळुंके, शिवसेना तालुका प्रमुख (ठाकरे गट) अमोल बिराजदार, आनंदसिंग बायस, नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, अशोक क्षीरसागर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्राचार्य शहाजी जाधव, राजेंद्र क्षीरसागर, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, सुग्रीव क्षीरसागर, सोमनाथ भोजणे, संजय दरेकर, बालाजी माटे, शाखा अभियंता अरुण रोडगे, अमोल माळी, लक्ष्मण रोडगे, दिनेश माळी, सचिन माळी, संतोष माळी, संतोष क्षीरसागर, राम क्षीरसागर, सतिश माळी, रघुनाथ माळी, ज्ञानेश्वर माळी, पंडित माळी, श्रीकांत माळी, प्रशांत क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, शंकर माळी, महेश माळी, विष्णु क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर, सचिन करे, गुरुदेवी माळी, प्रणिता क्षीरसागर, वि.का.सोसायटी संचालक सुनंदा क्षीरसागर, सुजाता क्षिरसागर, गितांजली क्षिरसागर, भाग्यश्री काटे, मनिषा माळी, मंगल माळी, सुनिता फुलसुंदर, इंदाबाई माळी, काशीबाई माळी, निता क्षीरसागर, मनिषा फुलसुंदर, शितल माळी, शांताबाई क्षीरसागर, माधुरी गवळी, जयश्री वाघमारे, मंगल माळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक माळी यांनीतर श्रीनिवास माळी यांनी आभार मानले.

Tags: सावित्रीबाई फुले जयंती
Previous Post

लोहारा तालुका क्रिडा कर्मचारी संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा – दिव्यांग मुलींचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा - दिव्यांग मुलींचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!