लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त लोहारा शहरातील लोकवाचनालय येथे शनिवारी (दि.६) वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अजित चिंतले हे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवि पवार, लोहारा लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे, जेष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम विरोधे, ग्रंथपाल संजय जेवळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालाजी बिराजदार, जसवंतसिंह बायस, अब्बास शेख, अशोक दुबे, गणेश खबोले, विक्रांत संगशेट्टी, सुमित झिंगाडे, तानाजी माटे, शंकर झिंगाडे, सुदर्शन रोडगे, खंडू माळवदकर, मदन पाटील, श्रीशैल्य मिटकरी, नागेश रजपूत, रमेश ठेले, उमाकांत स्वामी, मनीषा महानुर, जयश्री लांडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून जसवंतसिंह बायस यांनी आभार मानले.