उमरगा – प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी निलेश श्रीकांत गायकवाड यांची असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यापूर्वी ते पश्चिम बंगाल येथील अलीपुरद्वार जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोलकाता पोलीस आयुक्तालय हे पश्चिम बंगाल राज्याच्या सहा अध्यक्षीय पोलीस दलांपैकी एक असून ते १८५६ मध्ये स्थापन झालेले देशातील सर्वात जुने पोलिस आयुक्तालय आहे. कोलकाता पोलिस प्रशासनामध्ये जवळपास ८५ पोलिस ठाण्यांचा समावेश असलेले ८ विभाग आहेत. त्यामध्ये दक्षिण विभाग, उत्तर आणि उत्तर उपनगर विभाग, मध्य विभाग, पूर्व उपनगरी विभाग, बंदर विभाग, दक्षिण पूर्व विभाग, दक्षिण उपनगर-जादवपूर विभाग, दक्षिण पश्चिम-बेहाला विभाग या विभागांचा समावेश होतो. कोलकाता पोलीस दलात सशस्त्र दलाच्या आठ बटालियन तसेच विशेष शाखा आहेत. अपारंपरिक गुन्हे, दहशतवाद आणि संबंधित क्रियाकलाप प्रभावीपणे हाताळण्यासाठी हे दल विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामधून मिळणारा अनुभव निश्चितच पुढील जीवनाच्या यशस्वीतेसाठी पूरक ठरणार आहे.