वार्तादूत : डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी या दोन संदर्भात सत्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. २४ रोजी सत्काराचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.
श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे हस्ते डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. आहे. तसेच श्री शिरिष यादव यांची उत्कृष्ट उप जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार २०२४ साठी श्री. संजय पाटील मतदार नोंदणी अधिकारी २४२ – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कळंब व भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी उत्कृष्ठ कामगिरी करणारी संस्था म्हणून श्री मारुती बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्था,नळदूर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी, महिलांची अधिक मतदार नोंदणी, विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील मतदारांची नोंदणी, तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी तसेच दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. दि. २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीत एकूण १३ लाख ६६ हजार ७२२ मतदार आहेत. सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी एकूण नमुना ६ चे एकूण ८७०८१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार ४३ हजार ८६७, पुरुष मतदार ४३ हजार २०१ व इतर १३ मतदार आहेत. मयत, दुबार, स्थलांतरीतचे एकूण ६२ हजार ९४७ नमुना ७ चे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार २९ हजार ७८०, पुरुष मतदार ३३ हजार १६४ व इतर ३ मतदार आहेत. तसेच नाव व पत्ता दुरुस्तीचे नमुना ८ चे एकूण २७ हजार १०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार १० हजार २३०, पुरुष मतदार १६ हजार ८६३ व इतर ११ मतदार आहेत.
भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी धाराशिव जिल्हयात एकूण ६१ शिबिरे घेण्यात आली. या शिबिराअंतर्गत ६ हजार ९६८ लाभार्थींना विविध सेवा पुरविण्यात आल्या. यामध्ये नव मतदार नोंदणी १ हजार २९५, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती ९०३, शिधा पत्रिका वितरण २ हजार १९, जात प्रमाणपत्र वितरण २ हजार ४७६ व सामाजिक योजनांचा २७५ लाभार्थींना लाभ देण्यात आला.