महामार्गावरील (Highway) अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार (Suresh Birajdar) यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती. या स्ट्रक्चरल ऑडिटच्या दणक्याने महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराने गंजलेल्या सळयांचे सांगाडे तात्काळ काढून टाकल्याने सुरेशदाजी बिराजदार यांच्या मागणीला यश आले आहे .
उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मागील आठ वर्षांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांच्या गंजलेल्या सळयाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) प्रशासकीय तपासणी करून परवानगी नंतरच काम सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली होती.
या निवेदनात म्हणले होते की, उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम मागील आठ वर्षांपासून संथ व निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरील उमरगा, लोहारा, तुळजापूर व जिल्ह्यातील अर्धवट स्थितीतील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सर्व उड्डाण पुलांच्या कामांचे (स्ट्रक्चरल ऑडिट) त्रयस्थ संस्था व प्रशासनाकडून केल्यानंतर व अधिकृत परवानगी घेऊनच करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीच्या धोक्यास व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते तसेच ही जीवघेणी कामे थांबली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (ncp) वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला होता.
या निवेदनानंतर माननीय जिल्हाधिकारी (collector) सचिन ओंबासे यांनी महामार्ग प्राधिकरणाला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराने या स्ट्रक्चरल ऑडिटच्या दणक्याने महामार्गावरील गंजलेल्या सळयांचे सांगाडे काढून टाकले आहेत. सुरेश बिराजदार यांना महामार्ग प्राधिकरणाने पत्रही पाठवले आहे. यापुढेही महामार्गाबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सुरेशदाजी बिराजदार यांनी म्हणले आहे.