Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0
एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना रुजविण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास आणि शाळेविषयी अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकोंडी (लो) येथे नाविन्यपूर्ण शालेय गणवेश वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व मुला-मुलींना पँट, शर्ट आणि ब्लेझर यांचा समावेश असलेले आकर्षक गणवेश मोफत वितरित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना पँट-शर्टसह ब्लेझर देण्याचा हा उपक्रम परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे. जिल्ह्यात अशा स्वरूपाचा उपक्रम कोणत्याच जिल्हा परिषद शाळेत नसेल. अशा पद्धतीने या गणवेश वाटपाचे वेगळेपण अधोरेखित होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने व शिक्षक वनराज सूर्यवंशी, प्रदीपकुमार गुडले, प्रतिभा येदले व सुश्मिता मलकलपट्टे या सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे पुढाकार घेत आपल्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना हे गणवेश मोफत उपलब्ध करून दिले. या उपक्रमासाठी जवळपास १ लाख १५ हजार रुपये किमतीचे गणवेश वितरित करण्यात आल्याचे मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने यांनी सांगितले. शिक्षकांनी केवळ अध्यापनाची जबाबदारी न पार पाडता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दाखविलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आकर्षक गणवेश मिळण्याबरोबरच त्यांच्यात एकसमानतेची भावना, शिस्त, आत्मविश्वास आणि शाळेविषयी आपलेपणा वाढण्यास मदत होणार आहे. शिक्षकांच्या एकजुटीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून राबविलेला हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. या नाविन्यपूर्ण गणवेशामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आकर्षक गणवेशामुळे विद्यार्थी हे इंटरनॅशनल स्कूल सारखे दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा आणि शिक्षणाप्रती सकारात्मक वातावरण निर्माण करणारा हा उपक्रम म्हणजे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा आदर्श नमुना आहे.


याबद्दल मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने व शिक्षक वनराज सूर्यवंशी, प्रदीपकुमार गुडले, प्रतिभा येदले व सुश्मिता मलकलपट्टे यांचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख मोहन अगंबरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सर्व सदस्य, एकोंडी (लो) गावच्या सरपंच सुलक्षणाताई सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


सध्या मुलांनी परिधान केलेला ‘कोट, टाय आणि पॅन्ट’ हा नवीन गणवेश विद्यार्थ्यांवर अत्यंत छान दिसतो. यामुळे मुलांमध्ये अभ्यासासोबतच एक वेगळी शिस्त आणि संस्कार निर्माण होत आहेत. ​आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले कोणत्याही खाजगी किंवा इंग्लिश स्कूलच्या मुलांपेक्षा कमी नाहीत, यामुळे आपल्या शाळेची प्रतिमा अधिक उंचावेल आणि सर्वांना या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटेल.

देवेंद्र आयलाने,
मुख्याध्यापक

Ad 2
Ad 1
Tags: एकोंडी (लो)जिल्हा परिषद शाळानाविन्यपूर्ण उपक्रमलोहारा
Previous Post

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!