नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी लोहारा नगरपंचायतकडून आर. ओ. प्लांट उभारण्यात आला आहे. या आरओ प्लांटचा शुभारंभ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) फित कापून करण्यात आला.
नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक आरिफ खानापुरे यांनी तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले व नगरपंचायत कार्यालयाकडे मागणी केली होती. यासाठी ज्ञानराज चौगुले यांनी पाठपुरावा करून या आरओ प्लांट साठी निधी मंजूर केला. हा प्लांट कार्यान्वित झाला असून सोमवारी (दि.२) या प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उमरगा नगरपरिषदेचे अध्यक्ष किरण गायकवाड, युवानेते आनंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १६ मधील विविध

विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल नगरसेवक आरिफ खानापूरे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्लांटच्या माध्यमातून अत्यल्प दरात नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमासाठी धर्मगुरू शाह हुसेन कादरी, लोहारा पंचायत समितीचे उपसभापती अमोल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, अभिमान खराडे, माजी नगरसेविका निर्मला स्वामी, अविनाश माळी, अमोल बिराजदार, जालिंदर कोकणे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर गवंडी यांनी केले.







