Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुमार साहित्य संमेलन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुमार साहित्य संमेलन
Ad 10

लोहारा तालुक्यातील हराळी येथे छात्र प्रबोधन ज्ञानप्रबोधिनी पुणे व ज्ञान‌प्रबोधिनी हराळी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२७) कुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ज्ञानप्रबोधिनी हराळीचे विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील शाळांमधील एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी पाच सुप्रसिद्ध लेखक, कवी व लेखिका उपस्थित होत्या. आश्लेषा महाजन, रेणू पाचपोर, फारुक काझी, स्वाती ताडफळे, श्वेता रानडे यांनी आपल्या उपस्थितीने संमेलनाची शोभा द्विगुणित केली. छात्र प्रबोधन तर्फे शिल्पाताई कुलकर्णी व हराळी ज्ञान प्रबोधिनीच्या तर्फे श्रुती फाटक यांनी संमेलनाच्या नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कुमारांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, भाषेची सौंदर्यस्थळे पाहायला शिकावे, अभिव्यक्ती करण्यास सक्षम व्हावे आणि परिणामी मराठी भाषेचे प्रेम विद्यार्थ्यांना लागावे या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. मान्यवर साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली कथालेखन, काव्यलेखन व काव्यवाचन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण व अभिवाचन अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या विषयांमधील सौंदर्य व आनंद उलगडून दाखवला व त्यांनी बोलते व्हावे, लिहिते व्हावे यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. सर्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळा खूप आवडल्या व खूप उत्साहाने त्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त लेखन व वाचन केले. मान्यवरांनाही विद्यार्थ्यांचा उत्साह भावला. साहित्यिकांशी गप्पा या सत्रात विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात येणारे प्रश्न साहित्यिकांना विचारावयाचे होते. येथेही मुलांनी खूपच चांगले प्रश्न विचारून साहित्यिकांचा लेखनप्रवास जाणून घेतला.
दुपारच्या सत्रामध्ये मराठी भाषेची गंमत शिकवणारे कल्पक खेळांच्या १० स्पर्धा घेण्यात आल्या. यातही सर्वांनी खूप उत्साहाने भाग घेतला. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या खेळांमुळे शब्दसंग्रह वाढण्यास मदत झाली. यानंतर संमेलनाच्या समारोपप्रसंगी काही विशेष गुणी विद्यार्थ्यांनी अभिवाचन, काव्यवाचन इ. सादर केले. हराळी ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे यांनी मार्गदर्शन केले. म्हणी कशा तयार होतात याची गंमतीदार गोष्ट सांगून त्यांनी भाषेवर प्रेम करायचा संदेश दिला. संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व संमेलनाची सांगता झाली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हे मराठीचा गौरव करणारे संमेलन यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: संमेलनहराळी
Previous Post

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

Next Post

मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या – लोहारा तालुका सकल मराठा समाजाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या – लोहारा तालुका सकल मराठा समाजाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या - लोहारा तालुका सकल मराठा समाजाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's