शहीद भगतसिंग विद्यालय, जिल्हा परिषद शाळा कलदेव लिंबाळा येथील विद्यार्थी व युवक एकत्रित येत शुक्रवारी (दि.२१) राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्ञान प्रबोधिनी संस्था हराळी येथील प्रतिनिधी सचिन सुर्यवंशी यांनी योग दिनाचे महत्व सांगून आजच्या जीवनशैलीत योगाचा होणारा परिणाम याविषयी मुलांसोबत संवाद साधला. आपले शरीर व मन मजबूत करण्यासाठी योगा नियमित विद्यार्थिसह, युवकांनी करणे खूप गरजेचे आहे. मन स्थिर, एकाग्र, होण्यासाठी ध्यान ही आवश्यक आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी मन कणखर असावे लागते. अपयश आले तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे असल्याने त्यासाठी योग, ध्यान, व्यायम हा करावा. तसेच चेतना व्यायम, योग, ध्यान याची प्रत्यक्ष कृती ज्ञान प्रबोधिनी संस्था हराळी येथील युवक कार्यकर्ते आदर्श ढाकणे यांनी करुन दाखवली. सर्व मुलांनी आनंदात राष्ट्रीय योगदिन साजरा केला. यावेळी विद्यार्थी, सरपंच महादेव कांबळे, मुख्याध्यापक प्रमोद तावशिकर यांच्यासह शिक्षकवृंद व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.