Vartadoot
Tuesday, June 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथे संत शिरोमणी मारुती महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथे संत शिरोमणी मारुती महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील माकणी येथे सोमवारी (दि.९) संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
तालुक्यातील माकणी येथे संत शिरोमणी मारुती महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. माकणी येथे सोमवारी (दि.९) सकाळी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पादुका मंदिरापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत पालखीतून महाराजांच्या पादुका तर बैलगाडीत महेश महाराज व श्यामचैतन्य महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डोक्यावर कळश घेतलेल्या महिला, धनगरी ढोल, हलगी, वारुच्या पथकासह परिसरातील गावातून आलेले भजनी मंडळ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच उमरगा तालुक्यातील भुसणी येथील श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री संत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील श्री संत देवाजी बाबा वारकरी शिक्षण संस्था येथील वारकरी शिक्षण संस्थेचे व माकणी येथिल जिल्हा परिषद शाळेचे जवळपास तीनशे विद्यार्थी यावेळी टाळ मृदंगासह सहभागी झाले होते.
सकाळी नऊ वाजता निघालेली ही मिरवणूक दुपारी एकच्या सुमारास पादुका मंदीराजवळ पोहोचली. यावेळी संताच्या आरतीने सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या मिरवणूकीत माकणीसह करजगाव, धानुरी, हराळी, तोंरबा, करवंजी, चिंचोली (काटे), खेड सालेगाव, तावशीगड, सास्तूर, लोहटा, सारणी, मातोळा या गावासह परिसरातील भजनीमंडळ, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माकणीमारुती महाराज
Previous Post

शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

Next Post

पुस्तक प्रकाशन व माजी विद्यार्थ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
पुस्तक प्रकाशन व माजी विद्यार्थ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन

पुस्तक प्रकाशन व माजी विद्यार्थ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505508

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!