घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल मंजूर होण्याकरिता बांधकामाचे फोटो व त्याबाबत ऑनलाईन रिपोर्ट पंचायत समिती लोहारा येथे जमा केल्याचा मोबदला म्हणून रु. ५ हजार रुपयांची मागणी करून ३ हजार लाच रक्कम स्वीकारल्या प्रकरणी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास (कंत्राटी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.२) ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार यांचे मंजूर घरकुलाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल 45,000/- रुपये मंजूर होण्याकरिता बांधकामाचे फोटो व त्याबाबत ऑनलाईन रिपोर्ट पंचायत समिती लोहारा येथे जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रार यांचेकडे 5000/- रूपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 3000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली म्हणून आरोपी लोकसेवक ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ( कंत्राटी), पंचायत समिती लोहारा निखिल लिंबराज मस्के लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे मुरूम, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सापळा अधिकारी विकास राठोड हे होते. या पथकात पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी, चापोना दत्तात्रय करडे आदी सहभागी होते.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव
@ दुरध्वनी क्रं. 02472-222879
@ टोल फ्रि क्रं. 1064