Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहाऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वामी रामानंद तीर्थ यांचे दिले नाव

मुख्य संपादक by मुख्य संपादक
17/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहाऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वामी रामानंद तीर्थ यांचे दिले नाव
Ad 10

लोहारा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण करण्यात आले असून स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबत दि.१५ जानेवारी रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (सिटीएस) प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे. सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. दि. ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा. मंत्री (कौ.रो.उ. व ना.) विभाग यांची एकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करुन नावात बदल करणेबाबत निर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती असे या शासन निर्णयातील प्रस्तावनेत म्हणले आहे.

त्यानुसार राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नांव बदलण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे असे या निर्णयात म्हणले आहे. या शासन निर्णयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रस्तावित जिल्हा निहाय नावांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करण्यास देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरुन संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी पुढील आवश्यक कार्यवाही करावी असे या निर्णयात नमूद केले आहे. या शासन निर्णयानुसार लोहारा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही यापुढे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाणार आहे.

——-

लोहारा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्यात यावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर याबाबत शासन निर्णय घेण्यात आल्याने राज्य शासनाचा आभारी आहे.

ज्ञानराज चौगुले,
माजी आमदार

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: औद्योगिक प्रशिक्षण संस्थालोहारास्वामी रामानंद तीर्थ
Previous Post

नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रिडा सप्ताहास सुरुवात

Next Post

रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह

रामकथा - दिवस तिसरा; पहा लाईव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's