लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडा सप्ताहास सुरवात झाली आहे.
या क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने मैदानी, वैयक्तिक, व सांघिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्या उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाषाबा जाधव यांच्या जयंती निमित्त व महाराष्ट्र क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा स्पर्धेस सुरवात झाली आहे. या क्रीडा सप्ताहाचे उदघाटन पर्यवेक्षक भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा सप्ताहमध्ये गोळाफेक, थाळीफेक, धावणे, बुद्धिबळ, कबड्डी, क्रिकेट इत्यादी क्रीडा स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रशांत काळे, क्रीडा विभागप्रमुख नागनाथ पांढरे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. सुनिल बहिरे, प्रा. विष्णुदास कलमे, प्रा. ज्ञानदेव, शिंदे, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. राजेश आष्टेकर, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. विजय उंबरे, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. रामचंद्र खुणे, प्रा. दगडू साठे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.