Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ प्रथम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
02/02/2025
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथील वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ प्रथम
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिक्षणरत्न शिवाजीराव मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.
तालुक्यातील माकणी येथे शुक्रवारी (दि.३१) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संस्थेचे संस्थापक तात्यारावजी मोरे, श्रीधररावजी मोरे, शिवाजीराव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे, संचालक रामराव इंगोले, विठ्ठलराव नरसाळे, अशोक पाटील, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. व्ही. थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात स्पर्धेचा निकाल घोषीत करुन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी किशोर साठे, विठ्ठलराव नरसाळे, सुरेश मरगळे, सचिन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यासह शेजारील लातूर व सोलापूर जिह्यातील महाविद्यालयातील एकूण १८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी ‘स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होत आहे / नाही’ हा विषय ठेवण्यात आला होता. यात दमदार व सडेतोड मतमत्तांतर करत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने ( संजीवनी गिलडा, सानिका बादुले) यांनी (रोख रक्कम १०००१/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) प्रथम क्रमांक पटकावला. लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाने ( आदिती ढगे व वैष्णवी पांचाळ) रोख रक्कम ७००१/- , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) व्दितिय क्रमांक, तर मुरुम येथील कला, विज्ञान व वाणिज्य स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाने (शुभांगी जाधव व शिफा पटेल) (रोख रक्कम ५०००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून धाराशिव येथील तेरणा महाविद्यालय (गायत्री जांगीड व मनीषा जांगीड) यांनी प्रथम, माकणी येथील बीएसएस महाविद्यालय (सुप्रिया मुगळे व पृथ्वीराज रनखांब) द्वितीय तर उदगीर येथील शिवाजी महाविद्यालय (अंबिका ढोबळे व संचिता सावंत) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या बरोबर सर्व सहभागी संघ व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. राजेंद्र निगडे (श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी), डॉ. सुभाष हुलपल्ले (माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम), डॉ. सन्मुख मुच्छटे (श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा) यांनी काम पाहिले.
प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करुन दिला. उपप्राचार्य डॉ. डी.व्ही.थोरे यांनी स्पर्धेच्या विषयाचे विवेचन व स्पर्धेचे नियम व अटी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण लोमटे, प्रा. डॉ. रुपचंद खराडे व प्रा. डॉ. अनिल गाडेकर यांनी केले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेसाठी बाहेरुन स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारावादविवाद स्पर्धा
Previous Post

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

Next Post

सचिन ज्वेलर्स माकणी यांच्याकडून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

सचिन ज्वेलर्स माकणी यांच्याकडून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's