Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कार्यकर्त्यांनो, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा; मंत्री अतुल सावे यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
07/02/2025
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
कार्यकर्त्यांनो, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा; मंत्री अतुल सावे यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन
Ad 10

कार्यकर्त्यांनो, सदस्य नोंदणीचे काम गांभीर्याने करा. यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
लोहारा शहरात गुरुवारी (दि.६) भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत. या मेळाव्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपाचे संघटनमंत्री संजय कोडगे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्तात्रय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संघटन मंत्री संजय कोडगे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, इच्छा शक्ती असेल तर सदस्य नोंदणीचे हे काम अगदी सोपे आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जर सदस्य नोंदणी जास्तीत जास्त केलात तरच आपली संघटनेची ताकद निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी सदस्य नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला. या मेळाव्यासाठी जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, बाबा सूंबेकर, संपत देवकर, दिलीप पवार, अनिल ओवंडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रांत संगशेट्टी यांनी केले. या मेळाव्यात जास्त सदस्य नोंदणी केल्याबद्दल लोहारा शहरातील दगडू तिगाडे यांचे मंत्री अतुल सावे, भाजपाचे संघटनमंत्री संजय कोडगे यांनी कौतुक केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भाजपामेळावालोहारा
Previous Post

लोहाऱ्यात उद्या भाजपाचा कार्यकर्ता मेळावा

Next Post

तब्बल तीस वर्षानंतर स्नेह मेळाव्यानिमित्त वर्गमित्र आले एकत्र; आठवणींना दिला उजाळा

Related Posts

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

05/09/2026
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
Next Post
तब्बल तीस वर्षानंतर स्नेह मेळाव्यानिमित्त वर्गमित्र आले एकत्र; आठवणींना दिला उजाळा

तब्बल तीस वर्षानंतर स्नेह मेळाव्यानिमित्त वर्गमित्र आले एकत्र; आठवणींना दिला उजाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's