कार्यकर्त्यांनो, सदस्य नोंदणीचे काम गांभीर्याने करा. यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
लोहारा शहरात गुरुवारी (दि.६) भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत. या मेळाव्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपाचे संघटनमंत्री संजय कोडगे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्तात्रय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संघटन मंत्री संजय कोडगे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, इच्छा शक्ती असेल तर सदस्य नोंदणीचे हे काम अगदी सोपे आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जर सदस्य नोंदणी जास्तीत जास्त केलात तरच आपली संघटनेची ताकद निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी सदस्य नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला. या मेळाव्यासाठी जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, बाबा सूंबेकर, संपत देवकर, दिलीप पवार, अनिल ओवंडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रांत संगशेट्टी यांनी केले. या मेळाव्यात जास्त सदस्य नोंदणी केल्याबद्दल लोहारा शहरातील दगडू तिगाडे यांचे मंत्री अतुल सावे, भाजपाचे संघटनमंत्री संजय कोडगे यांनी कौतुक केले.