लोहारा शहरात गुरुवारी (दि.६) भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासाठी सर्व बूथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांनी केले आहे.