Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/08/2026
in Blog, लोहारा तालुका
A A
0
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Ad 10

रुढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मानाने वागणूक दिली जावी. पण समाजामध्ये असं न घडता महिलेचा पती वारल्यानंतर लगेच त्या महिलेचे कुंकू पुसले जाते व बांगड्या फोडल्या जातात. याबाबत कुठेतरी समाजात जनजागृती करून ज्या एकल महिला आहेत त्यांनाही सर्वसामान्य महिलासारखं सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी त्यांना सन्मान द्या असे आवाहन विजय जाधव यांनी केले.
लोहारा येथे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना विजय जाधव बोलत होते. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा वैशाली खराडे, शिवसेना (युबीटी) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, वंदना भगत, साऊ समितीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील, विठ्ठल चिकुंद्रे, ज्योती राजपूत, गौरी पंडित, लता काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले की, महिलेचे अलंकार असलेले कुंकू लावून एकल महिलांना सर्वच कार्यक्रमात सन्मान दिला जावा.

त्याचबरोबर कौटुंबिक वाद व पती-पत्नी वाद विवाद होत असतात. अशातूनच कोर्ट कचेऱ्या होतात. त्यामुळे असे वाद विवाद न करता सामांज्यसाने सोडवले पाहिजे. असे वाद साऊ समिती सामंजस्याने सोडवत आहे असे प्रतिपादन समितीचे जिल्हा समन्वयक विजय जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात एकल महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या मेळाव्यात विजय जाधव यांनी बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व तसेच दिव्यांग व इतर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
या मेळाव्याला लोहारा येथील अनेक एकल महिला उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: एकल महिलालोहारा
Previous Post

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

Next Post

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's