एका वाहनातुन प्रतीबंधीत अन्न पदार्थ पान मसाला व सुगंधी सुपारी विक्रीसाठी घेवून जात असताना लोहारा पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या कारवाईत एकूण २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील लोहारा खुर्द येथे नाकाबंदी करत असताना लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकास एक पांढरे रंगाचे बंदबॉडी महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप क्र. MH-25-AJ-5966 या वाहनातुन प्रतीबंधीत अन्न पदार्थ पान मसाला व सुगंधी सुपारी विक्रीसाठी घेवून जात असताना आढळला. त्यामुळे सदर वाहन, आरोपी व प्रतीबंधीत अन्न पदार्थाचा साठा पोलीस स्टेशन लोहारा येथे आणून ठेवला व पूढील कार्यवाही साठी अन्न व औषध प्रशासन विभागास कळवले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी पंचासमवेत पोलीस स्टेशन लोहारा येथे येवुन सदर साठ्याची अन्न सुरक्षा कायदया अंतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असुमाअ/अधिसुचना-581/2024/7 नुसार प्रतिबंधीत केलेला जवळपास १८ लाख रुपयांचा साठा आढळुन आला. सदर साठ्यातील प्रतिबंधीत अन्न पदार्थामधील प्रत्येकी एक-एक पॅकेट विश्लेषणासाठी घेण्यात आले. व उर्वरीत साठा जप्त करण्यात आला व सदरचा मुद्देमाल तसेच जप्त केलेले वाहन क्र. बोलेरो पिकअप क्र. MH-25-AJ-5966 सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेशा पर्यंत लोहारा पो.स्टे. येथे लावण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय मुर्गे (रा. धनेगाव, ता. केज, जिल्हा बीड) गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी दिली.