जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना जिल्हा शाखा धाराशिव यांचे वतीने गुरुवारी (दि.४) सत्कार करण्यात आला.
मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या मार्फत वेळोवेळी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करून १० वर्ष सेवा झालेल्या १२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना एस -१४- विस्तार अधिकारी यांची वेतनश्रेणी तसेच २० वर्ष सेवा झालेल्या ३० ग्रामपंचायत अधिकाऱी यांना एस १६ सहाय्यक गटविकास अधिकारी यांची वेतनश्रेणीचा लाभ तसेच ३० वर्षे सेवा झालेल्या ५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना एस-२० गटविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच १३ ग्रामपंचायत अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू आदेश निर्गमित केल्यामुळे संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप, राज्य संघटनेचे कायदे सल्लागार विजयसिंह नलवडे, लोहारा तालुका सचिव तानाजी जाधव, सुनील कंदले, ऋषिकेश कुलकर्णी, गुणवंत कांबळे उपस्थित होते. सदरील आदेश पारित करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम भालके व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.







