लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात शुक्रवारी (दि.४) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कृष्णाच्या वेशभूषेत शिवम बलभिम आलमले, केदार बाळू पंढरपूरे, अथर्व माणिक मुंजाळे या पाचवीच्या या विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारली होती. दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन प्राचार्य तथा मुख्याध्यापक व्यंकटराव गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यात चार थरांचा मनोरा दहावीच्या गोविंदानी उत्कृष्टपणे साकारला होता. तो उंच असलेली दहीहंडी फोडून यशस्वी केला. या दहीहंडी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उमाशंकर कलशेट्टी, नागनाथ पवार, हनुमंत पंढरपूरे, व्यंकट साळुंखे, पोपट पवार यांची उपस्थिती होती. यावेळी कृष्ण गोप गोपिकांनी सुंदर अशा गवळणी वरती नृत्य सादर केले. राधा – गोपिका बनून भगवती क्षीरसागर, मयुरी माने, मनाली मल्लाडे, ईश्वरी कुंभार, दिव्या साठे, श्रेया जाधव, स्वरांजली मोरे, आरुषी राजपूत, मानसी आलमले, धनश्री गुंजोटे, सिद्धी स्वामी, प्राप्ती मोरे, वैष्णवी सूर्यवंशी, आदिती सूर्यवंशी, जानवी साठे, आरोही बंडगर या विद्यार्थिनींनी राधाची वेशभूषा साकारली होती. उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना खूप मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

शिक्षक राजेश्वर वाघमारे, किशोर पवार, प्रभाकर बनसोडे, पर्यवेक्षक गणेश साठे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला शिक्षक राजेश्वर वाघमारे यांच्यातर्फे अकराशे रुपये पारितोषिक देण्यात आले.







