लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने जिल्हासरीय युवा महोत्सवात यश मिळवले असून एकांकिका स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे आयोजित करण्यात आला होता. यात लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालया कडून एकूण सहा कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदण्यात आला होता. यामध्ये एकांकीका, समूहगीत, सुगम गायन, चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व इ. कला प्रकारचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या ‘मॅडम’ या एकांकीकेने तृतीय क्रमांक पटकावून संघांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ५ ते ७ ऑक्टोबर

दरम्यान होणाऱ्या केंद्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. एकांकीकेचे दिग्दर्शन कु. प्रांजल वसंत जाधव हिने केले. सदरील एकांकिकेचे उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही कु. प्रांजल जाधव हीने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक समन्वयक म्हणून डॉ. व्यंकट चिकटे तर टिम प्रमुख म्हणून प्रा. प्रतिक्षा कदम यांनी काम पाहिले. यामध्ये अंजली चव्हाण, प्रज्ञा कदम, संस्कृती माने, सावित्री भुजबळ यांनी मुख्य भूमिका साकारल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, प्राचार्य प्रा. डॉ. रामदास ढोकळे, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.







