Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भातागळी येथील मानाच्या काठीचे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
13/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
भातागळी येथील मानाच्या काठीचे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील भातागळी (bhatagali) येथील मानाच्या काठीचे शुक्रवारी (दि. १२) शिखर शिंगणापूरकडे (shinganapur) प्रस्थान झाले. हजारो भाविकासह कटल्या, नंदी, कावड इत्यादींच्या सोबत ही काठी शिखर शिंगणापूरकडे रवाना झाली. यावेळी भातागळी ग्रामस्थांनी काठीसोबत जाणाऱ्या भाविकांना गावाबाहेर येत निरोप दिला.
तालुक्यातील भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर पार करत १७ एप्रिल रोजी सायंकाळी ही काठी शिखर शिंगणापूर मध्ये पोहोचेल. शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या (mahadev) मुख्य मंदिरात काठीचा विवाह सोहळा संपन्न होतो. धार्मिक विधीही होतात. शिखर शिंगणापूरमध्ये भातागळीच्या महादेवाच्या काठीला विशेष असा मान आहे. भातागळीची काठी ही शंभू महादेवाची अर्धांगिनी अर्थात पार्वतीचे रूप मानले जाते. भातागळी गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी या काठीला अर्थात नवरीला सजवले जाते. तिची मनो भावे पूजा केली जाते. भातागळी गावात एकाही घरावरती गुढी न उभारता काठी हीच सार्वजनिक गुढी उभी केली जाते. पाडव्यानंतर तीन दिवस काठी महादेवाच्या मंदिरामध्ये उभी असते. परिसरातील व गावातील नागरिक दररोज मनोभावे पूजा अर्चा, भजन, करतात तसेच दररोज संध्याकाळी काठीची प्रत्येक समाजाकडून आरती केली जाते.


काठी शिखर शिंगणापूरमध्ये पोहोचल्यानंतर एक दिवस मुक्कामी राहते. तसेच परतीचा प्रवासही सहा दिवसाचा असतो. यावर्षी ही काठी भातागळी गावांमध्ये २४ एप्रिल रोजी येणार आहे. त्यानंतर भातागळी गावच्या यात्रेला प्रारंभ होतो. दि. २५ व २६ एप्रिल रोजी ही यात्रा भरते. यावर्षी दि. २५ व २६ एप्रिलला भातागळी फेस्टिवल अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या दरम्यान बैलगाडा (bailgada) शर्यतीचेही आयोजन करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भातागळीराज्यस्तरीय नृत्य स्पर्धालोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस – वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान

Next Post

निवडणूक खर्च निरीक्षक प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
निवडणूक खर्च निरीक्षक प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा

निवडणूक खर्च निरीक्षक प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's