Vartadoot
Friday, July 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

निवडणूक खर्च निरीक्षक प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा

विविध कक्षांना भेट देऊन घेतली कामकाजाची माहिती

मुख्य संपादक by मुख्य संपादक
13/04/2024
in आपला जिल्हा
A A
0
निवडणूक खर्च निरीक्षक प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा
Ad 10

धाराशिव दि.12 (जिमाका) भारत निवडणूक ( आयोगाने (election commission) 40 – उस्मानाबाद (osmanabad) लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च (election expenditure) निरीक्षक श्री.प्रदीप डुमडुम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा आढावा घेऊन निवडणुकीच्या कामाकरिता घटित विविध कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी (collector) डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,खर्चविषयक नोडल अधिकारी सचिन इगे,राज्य उत्पादन शुल्कचे बारगजे तसेच खर्चविषयक कक्षाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री.डुमडूम यावेळी म्हणाले, निवडणुकीच्या कामात प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. कोणतीही तक्रार येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.निवडणुकीतील खर्चविषयक बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे. उमेदवाराचा जो प्रत्यक्षपणे खर्च होतो ती माहिती उपलब्ध करून घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची तसेच विविध नोडल अधिकारी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.

श्री.इगे यांनी सादरीकरणातून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची विस्तृत माहिती श्री डुंगडुंग यांना दिली.

विविध कक्षांना भेटी
आढावा बैठकीनंतर श्री.डुंगडुग यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन समिती इमारतीत असलेल्या विविध कक्षांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी सी-व्हीजील अँप कक्ष, विविध परवाने व चौकशी कक्ष (एक खिडकी), नामनिर्देशन कक्षाला भेट देऊन तेथे स्थापन करण्यात आलेला उमेदवारांचे फोटो,फोटोंचे घोषणापत्र स्वीकारणे व निदेश पुस्तिका खर्चाचे पुस्तक उपलब्ध करून देण्याबाबतचा कक्ष, नामनिर्देशन तपासणी कक्ष,नामनिर्देशक दैनंदिन अहवाल कक्ष, अनामत रक्कम जमा करणे कक्ष, मतदार यादी कक्ष व कोरे नामनिर्देशन अर्ज तसेच शपथपत्र व इतर नमुने उपलब्धता कक्षाला भेट दिली व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली.

तसेच नियोजन समिती इमारतीत असलेल्या खर्च सनियंत्रण कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत व नियंत्रण कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व सानियंत्रण कक्षाला सुद्धा भेट दिली व कामकाजाची माहिती त्यांनी जाणून घेतली व काही उपयुक्त सूचनाही केल्या.

त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी श्री.जाधव,खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री. इगे,श्री.झाडे,श्री.खडसे तसेच संबंधित विभागाचे इतरह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबादजिल्हाधिकारी सचिन ओंबासेलोकसभा निवडणूक
Previous Post

भातागळी येथील मानाच्या काठीचे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान

Next Post

सालेगाव येथील आविष्कार घोगे याचे एनएमएमएस परीक्षेत यश

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
सालेगाव येथील आविष्कार घोगे याचे एनएमएमएस परीक्षेत यश

सालेगाव येथील आविष्कार घोगे याचे एनएमएमएस परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's