लोहारा तालुक्यातील राजेगाव परिसरात गुरुवारी (दि.१९) दुपारी भूकंपाचा (earthquake) धक्का बसल्याचे काहींनी सांगितले. तसेच या दरम्यान लोहारा शहरासह तालुक्यातील अन्य काही ठिकाणी हा धक्का जाणवला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. हा धक्का नेमका भूकंपच होता का याची खात्री प्रशासन करीत आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावरच याबाबत खुलासा होईल.