माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे मध्यरात्री तीन च्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव ११ ते २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता अंत्ययात्रा निघणार असून दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मनोहर जोशी हे शिवसेना – भाजपा (shivsena bjp) युती सरकारच्या काळात १९९५ ते १९९९ या काळात मुख्यमंत्री (chief minister) होते. त्यांनी अनेक पदावर काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakare) यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.