मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्याला अखेर यश मिळाले असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारण्यात आले होते. मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील दि.२० जानेवारी ला अंतरवाली सराटी येथून निघाले होते.
त्यांच्यासोबत मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईकडे पायी निघाला होता. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी येथे पोहोचली. अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून शनिवारी (दि.२७) पहाटे याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील हा अध्यादेश स्वीकारणार आहेत.
असा आहे अध्यादेश –