लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त रविवारी (दि.१९) प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महात्मा बसवेश्वर महाराज मंदिरात नंदी ध्वजारोहण करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात विधीवत पुजा करून ध्वज उभारण्यात आला. जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक येथे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, युवासेना धाराशिव लोकसभा प्रमुख आनंद पाटील, माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्तात्रय बिराजदार, जगदीश लांडगे, डॉ. अमलेश्वर गारठे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, हरी लोखंडे, के.डी. पाटील, बाळासाहेब पाटील, श्रीकांत भरारे,

अमोल बिराजदार, ओम कोरे, अविनाश माळी, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, दिपक मुळे, प्रशांत काळे, मल्लिनाथ फावडे, ईश्वर बिराजदार, ओम पाटील, रघुवीर घोडके, प्रकाश होंडराव, रौफ बागवान, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव होंडराव, उपाध्यक्ष शुभम पाटील, सचिव संतोष फावडे, महेश कुंभार, ज्ञानेश्वर काडगावे, रामेश्वर वैरागकर, सुमित फावडे समर्थ कुंभार यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लोहारा शहरात मंगळवारी (दि.२१) भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.








