पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे ध्यानात ठेवून मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून चेन्नई येथील डॉ श्री. रवि ॲक्युपंक्चर थेरपी तज्ञ, सिध्दा मेडिसीन यांच्या उपस्थितीत दि. 03 जानेवरी ते दि. 12 जानेवारी या काळात पोलीस मुख्यालयातील अंलकार हॉल येथे जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेसाठी वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे.
या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पेालीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ करण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव विभाग, श्री. स्वप्नील राठोड, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, जिल्हा विषेश शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कानगुडे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. आरविंद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार, श्री. पंडीत हे उपस्थितीत होते. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगीतले की, शिबीरादरम्यान सर्व प्रकारच्या आजारावर खात्रीशीर इलाज केला जाणार असून त्याचा लाभ पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांनी व धाराशिव शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.