सिल्लोड येथील इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक प्रितम मुळे यांना नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत रसायनशास्त्र विषयातील पी.एचडी पदवी घोषित करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने प्रितम मुळे यांना ही पीएचडी घोषित करण्यात आली. प्रा. प्रीतम मुळे यांनी “सपोरटेड झिरनिया बेस्ड सॉलिड ऍसिड कॅटेलिस्ट देअर कॅरेक्टराझेशन अँड एप्लीकेशन” या विषयावरील शोध प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर, धाराशिव येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. मेघश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. त्यांचे वडील आप्पाराव मुळे, आई सुजाता मुळे, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार उत्तमसिंह पवार, सचिव अशोक देवरे, प्राचार्य डॉ. जी. जी. राजपूत, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी प्रीतम मुळे यांचे अभिनंदन केले. त्यांचे मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तुपाचे) हे आहे. लोहारा तालुक्यातील अचलेर व परिसरातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.












