लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा गुरुवारी (दि.६) सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यानिमित्त विद्यालयात सत्कार करण्यात आला. विक्रम मधुकर राठोड १२ वी कला) याने १७ वर्षे वयोगटामध्ये पाच किलोमीटर चालणे द्वितीय क्रमांक, दिपक सतीश राठोड १२ वी (कला ) १९ वर्षे वयोगट पाच किलोमीटर चालणे द्वितीय क्रमांक व ११० मी. हार्डल्स प्रथम क्रमांक अशा प्रकारे घवघवीत यश संपादन करून श्री बसवेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या दोन विद्यार्थ्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभागप्रमुख बी.एस. पाटील, क्रीडा शिक्षिका कांबळे यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अशोक भुसणे, उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे, सचिव ॲड. प्रदीप पणुरे, सहसचिव प्रा. बसवराज पणुरे, शालेय समिती सभापती इराप्पा डिग्गे, प्राचार्य एम. वाय. भोसले, पर्यवेक्षक आर.व्ही. पाटील, एस. बी. कोरे यांनी सत्कार केला. सर्व संचालक मंडळ, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.








