लोहारा तालुक्यातील खेड येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत धानुरी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाचे उपक्रम राबवून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन उपक्रम ते होम राशन वितरण उपक्रम राबवून भाजीपाल्याचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी डॉ. रणजीत जाधव, पुष्पा जडगे यांनी सर्व महिलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी राहुल डिगोळे, राजश्री साळुंके, अश्विनी कांबळे, सुकुमार घोडके, सुजाता स्वामी यांनी आरोग्य विभागाचे उपक्रम राबवले. तसेच गावातील व्यंकट पाटील, मिलगार साहेब, जया कांबळे, अण्णाराव कांबळे, अविनाश राठोड, दत्ता कडबाने, हिना शेख, सुनंदा निर्मले आदींसह महिला उपस्थित होत्या.














