आपल्या भागातील युवक, युवती मेहनती होतकरू असूनही पारंपारिक व्यवसाय व शिक्षणावर भर देतात. अद्ययावत शिक्षणाचा स्वीकार करून शहरातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी मिळवू शकतात. आपल्या कुटुंबासह राज्य, देश आणि आपल्या समाज बांधवांच्या विकासासाठी तरुण पिढीने प्रयत्नात राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.
भूम, परांडा व वाशी तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भूम शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयात रविवारी (दि.२४) हा रोजगार मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजी गाढवे हे होते. या रोजगार मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भूमचे माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर खोसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, श्रीनिवास जाधवर, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, खलील पठाण, प्रविण यादव, सचिन तावडे, प्रशांत फंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे. परंतु पुढील काळात चांगल्या पद्धतीने काम करून, संघर्ष करून आपण जीवनात यशस्वी व्हावे तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात मिळालेल्या पदाच्या माध्यमातून लोक कल्याणकारी कामे व्हावीत असे आवाहन केले . यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, नवनाथ जगताप, प्रवीण यादव, जगदीश पाटील या रोजगार मेळाव्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग, आयटी, टेलिकॉम, बीपीओ आदी क्षेत्रातील विविध नामांकित ६० कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित युवक, युवतीच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. या मेळाव्यासाठी ऑनलाईन व प्रत्यक्ष असे एकूण १२३५ युवक, युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४३२ जणांना डायरेक्ट ऑफर लेटर देण्यात आले. तसेच ३०५ जणांना कंपनीने सेकंड राउंडसाठी बोलवणार असल्याचे सांगितले.
या मेळाव्यासाठी भूम तालुकाध्यक्ष ऍड. रामराजे साळुंके, वाशीचे तालुकाध्यक्ष ऍड. सूर्यकांत सांडसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, परांडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, प्राचार्य एस. बी. चंदनशिव, प्रा. संतोष शिंदे, जॉब कनेक्ट कंपनीचे रघुराम गायकवाड, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, शहराध्यक्ष जीवन गाढवे, आदिल शेख, अशोक साळुंके, बालाजी शिर्के, रणजित साळुंके, अभिजित वारे, वाशी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब काटवते, भागवत कवडे आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शंकरराव पाटील महाविद्यालयाचे, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सूर्यकांत सांडसे यांनी तर ऍड. रामराजे साळुंके यांनी आभार मानले.