लोहारा तालुक्यातील (कास्ती बु) येथील साई मंगल कार्यालयात रविवारी (दि. १०) शेतकऱ्यांसाठी विज्ञान संत अंकुश पाटील, सांगली यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील यांच्या वतीने विज्ञान संत अंकुश पाटील (सांगली) यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी कदम होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम साठे, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजीत लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंकुश पाटील यांनी सुपीक जमिन ठेवण्यासाठी व शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी औषधाचे जवळपास वीस प्रयोग करून दाखवून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी केले. सुत्रसंचालन दत्ता जावळे पाटील यांनी तर व्यंकट शिंदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास वसंत जावळे पाटील,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सुरेंद्र पाटील, प्रदीप पाटील, अॅड. शुभम पाटील, भाजपा माजी तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नरदेव कदम, चंद्रकांत पाटील, प्रताप लोभे, माजी सैनिक राजेंद्र सुर्यवंशी, विकास पाटील, विनोद जावळे पाटील, प्रताप पाटील, दत्ता घाडगे, ओंकार पाटील, लखन जाधव, श्याम पाटील, जयपाल पाटील, सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य जाफर मुलानी, संजय जाधव, राम मोरे, लखन चंदनशिवे, पिंटू जावळे, अजमेर कारभारी, सलीम शेख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
