Vartadoot
Wednesday, April 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस – वीज पडून बैल, म्हशी दगावल्या

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस – वीज पडून बैल, म्हशी दगावल्या
Ad 10

लोहारा शहर व परिसरात शनिवारी (दि.२०) दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतातील ज्वारीच्या कडब्याचेही नुकसान झाले आहे. त्यात शनिवारी (दि.२०) दुपारी अचानकपणे वातावरणात बदल झाला. दुपारी एकच्या सुमारास सर्वत्र काळोख पसरल्यासारखे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. लोहारा शहरासह तालुक्यातील भातागळी, माकणी, हराळी, सालेगाव, सास्तुर, उदतपुर, कानेगाव, जेवळी, आष्टाकासार, तावशीगड यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच यात शेतातील झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याचे नागरिकांनी सांगितले. एकंदरीत या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी नुकसान झाले आहे. सायंकाळी सहा पर्यंत अनेक ठिकाणी अधून मधून रिमझिम पाऊस सुरूच होता. दरम्यान दुपारच्या अवकाळी पावसात वीज पडून कानेगाव येथील पांडुरंग लोभे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या तीन म्हशींचा मृत्यू झाला आहे. तसेच माळेगाव येथील सुभाष कुंभार यांच्या बैलावर वीज पडून मृत्यू झाला आहे. या दरम्यान शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री १२ च्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अवकाळी पाऊसनुकसानलोहारा
Previous Post

जेवळी येथे आज होणार मानव विकास प्रतिष्ठान केंद्राचे उदघाटन

Next Post

ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी कानेगाव येथे जाऊन घेतली लोभे कुटुंबीयांची भेट – कुटुंबियांना दिला धीर

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
Next Post
ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी कानेगाव येथे जाऊन घेतली लोभे कुटुंबीयांची भेट – कुटुंबियांना दिला धीर

ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी कानेगाव येथे जाऊन घेतली लोभे कुटुंबीयांची भेट - कुटुंबियांना दिला धीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's