सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या जाहीर झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकही होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
लोहारा तालुक्यातही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच आपापल्या मतदारसंघात सक्रिय होऊन जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील भातागळी येथील रहिवासी असलेले किशोर रंगनाथ महामुनी हे भातागळी गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
महामुनी यांचे भातागळीसह गणातील इतर गावांमध्ये सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मागच्या वेळी भातागळी ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवत किशोर महामुनी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. परंतु यावेळी ते पूर्ण ताकतीने निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी किशोर महामुनी सध्या प्रयत्न करीत असले तरी येणाऱ्या काळात युती होईल की नाही यावर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील हे निश्चित होईल.








