पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील व तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी लोहारा तालुक्यातील विविध ठिकाणी बाधीत क्षेत्राला भेटी देऊन शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच पावसामुळे घर पडलेल्या दोन कुटुंबांना शरण पाटील फाऊंडेशन कडून आर्थिक मदत करण्यात आली.
लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेकांची खरीपाची पिके वाहुन गेली आहेत तर उर्वरित उभ्या पिकांना कऱ्या येत आहेत. विविध गावातील नदी व ओढयाकाठच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांसह माती वाहून गेली आहे. अनेकांची घरे पडून संसाराचा चिखल झाला आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना धीर देण्यासाठी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील व तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी बुधवारी (दि.१) तालुक्यातील अचलेर, आष्टा कासार, जेवळी, तावशीगड, सास्तुर, हिप्परगा (रवा) येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान लोहारा तालुक्यात शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे सरसकट पंचनामे करुन घेण्याच्या सुचना दिल्या.

या दौऱ्या दरम्यान अचलेर येथील भिमाशंकर माळगे व हिप्परगा (रवा) येथील रियाज मुलाणी यांचे घर कोसळून संसार उघड्यावर आला होता. या दोन्ही कुटुंबाला संकटाच्या काळात शरण पाटील फाऊंडेशनने सामाजिक जबाबदारी जपत शरण पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी २१ हजार रुपयाची मदत देण्यात आली. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, मुरुम बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंसचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, बुद्धिवंत साखरे, योगेश राठोड, हरी लोखंडे, दत्तात्रय गाडेकर, आष्टा कासारचे सरपंच सुलभा कांबळे, दिपक पाटील, रब्बानी नळेगावे, बालाजी वडजे, धीरज घोटाळे, योगेश आळंगे, प्रशांत आळंगे, सुजित शेळके, विजय लोमटे, विनोद मोरे, सुनिल जाधव, मुरलीधर होनाळकर, गंगाधर बलसुरे, शिवराज कमलापुरे, प्रकाश लोखंडे, संतोष फावडे, शिवप्रसाद होंडराव, राजु मुल्ला, परमेश्वर पटणे, केदार कदारे, झपु काझी, बालाजी चव्हाण, दयानंद साळुंके, अब्बास शेख आदीसह मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी उपस्थित होते.









