वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आमदार रोहित पवार हे गुरुवारी (दि.२१) उस्मानाबाद येथे कार्यक्रमासाठी येत आहेत. भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता आमदार रोहित पवार यांचे ‘ बदलत्या राजकारणातील युवकांसमोरील संधी व आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कोरोना योध्याचा सन्मानही होणार आहे.