वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, जस्ट डायल कंपनी व ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सोमवारी (दि.१) कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी लोहारा तालुका व परिसरातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांची निवड झाली. मुलाखतीसाठी जस्ट डायल कंपनीचे डेप्युटी मॅनेजर अभिजित पाटील, व्यंकटेश भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी मंडळाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. अमरसिंह माळी महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी उपस्थित होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या संकल्पनेतून लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्याचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करून विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे मत प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील नॅक समन्वय प्रा. व्यंकट चिकटे, प्रा. विनोद तुंगे, प्रा. स्वाती निकम, प्रा. राजेंद्र पाथरे, प्रा. राजपाल वाघमारे, अरविंद हंगरगेकर, गणेश गरड, दादा साठे, विक्रम जगताप आदींनी कॅम्पस इंटरव्ह्यू यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.