वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तीन दिवस विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्राध्यापिका धृती माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला असे प्रतिपादन प्राध्यापिका धृती माने यांनी केले.तीन दिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात नेमबाजी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच रेंज ऑफीसर प्रशिक्षक निळकंठ माने यांनी महिला स्वयंरक्षण तथा निर्भय व्हायला हवे यासाठी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी महिला सबलीकरणाविषयी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तिसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले.यावेळीं प्राध्यापिका धृती माने, पुजा भावे, राजश्री जाधव, प्राध्यापिका दिपाली भगत , स्नेहल चनसेट्टी, अभिलाषा हांडे, प्रिती शिंदे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.