वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यातील तरुणांना सैन्यदलात मोठ्या प्रमाणात नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठवाड्यात येत्या एक वर्षात ११ ठिकाणी डिफेन्स अकॅडमी सुरू करून याव्दारे मराठवाड्यातील तरुणांना ही संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
दि.२२ फेब्रुवारी रोजी माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीच्या माहिती संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, विनायक भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अंकुश नाडे , मातोळा गावचे सरपंच बालाजी सूर्यवंशी, माळकोंडजीचे माजी सरपंच संजय कुलकर्णी, प्रवीण कोपरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, गोरख सावंत, संतोष आनंदगावकर, जगदिश पाटील, नामदेव माने आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले यांनी तर सुत्रसंचालन नामदेव माने व प्रा. अंकुश नाडे यांनी आभार मानले.