Vartadoot
Tuesday, August 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मराठवाड्यातील तरुणांसाठी ११ डिफेन्स अकॕडमी सुरू करणार – आ. सतीश चव्हाण – १ एप्रिल पासून माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथे क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीची सुरुवात होणार

admin by admin
24/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यातील तरुणांना सैन्यदलात मोठ्या प्रमाणात नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठवाड्यात येत्या एक वर्षात ११ ठिकाणी डिफेन्स अकॅडमी सुरू करून याव्दारे मराठवाड्यातील तरुणांना ही संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
दि.२२ फेब्रुवारी रोजी माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीच्या माहिती संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, विनायक भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अंकुश नाडे , मातोळा गावचे सरपंच बालाजी सूर्यवंशी, माळकोंडजीचे माजी सरपंच संजय कुलकर्णी, प्रवीण कोपरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, गोरख सावंत, संतोष आनंदगावकर, जगदिश पाटील, नामदेव माने आदी उपस्थित होते.यावेळी आमदार सतीश चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्रातील सुमारे अठरा लाख तरुणांनी नौकरीसाठी एम्प्लॉयमेंट कार्यालयात नोंदणी केली आहे. मात्र सरकारने ठरवले तरीही ऐवढया मोठ्या प्रमाणात तरुणांना नौकरी देवू शकत नाहीत. या उलट संरक्षण खात्यात मुलांना नौकरीची सुवर्ण संधी आहे. याकडे मराठवाड्यातील तरुणांचे दुर्लक्ष असून शहरी भागातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुले शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असतात. यामुळे ग्रामीण भागात या डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा आपला मानस असून मराठवाड्यातील ग्रामीण भागात एका वर्षात अकरा डिफेन्स अकॅडमी सुरू करणार असून यामधून प्रतिवर्षी अकरा हजार तरुण या अकॅडमी मधून बाहेर पडतील अशी माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले यांनी तर सुत्रसंचालन नामदेव माने व प्रा. अंकुश नाडे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. सतीश चव्हाणक्रांतीवीर दत्तोबा भोसलेडिफेन्स अकॅडमीमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

Next Post

शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली…. आमदार विक्रम काळे – उमरगा तालुक्यातील मुरूम येथे शिक्षक संवाद अभियान संपन्न

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
Next Post

शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली.... आमदार विक्रम काळे - उमरगा तालुक्यातील मुरूम येथे शिक्षक संवाद अभियान संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's