Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुरूम शहरात स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी साजरी

admin by admin
20/05/2023
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

मुरूम येथील स्व. माधवराव उर्फ काका पाटील यांनी उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी, शिक्षणसंस्था, या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान-मोठ्या पाणी योजना, बेनीतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी, सहकार व औद्योगिक विकास. दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व  खाजगी साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकारी तत्वावरील मुरूमच्या माळरानावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे. म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन १९९४ साली विठ्ठलसाईच्या निमित्ताने रोवली गेली. साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेचा पाया रचला. पुढे त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला. तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरणजी पाटील हे वडीलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार्यतत्पर राहून वाटचाल करीत आहेत. स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी शनिवारी (दि.२०) मुरुम शहरात साजरी करण्यात आली.

मुरूम
प्रारंभी स्व. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शनिवारी (दि.२०) रोजी बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे माजी चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, विठ्ठल साई कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियॉं काझी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, प्रशांत पाटील, व्यंकटराव जाधव गुरुजी, मल्लिनाथ दंडगे, राजू तोडकरी, धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, प्रमोद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मुरूम
Previous Post

लोहारा शहरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न – लोहारा येथील क्लासिक डेव्हलपर्स यांच्याकडून आयोजन

Next Post

फसवणुकीचा गुन्हा दाखल – उस्मानाबाद जनता बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

फसवणुकीचा गुन्हा दाखल - उस्मानाबाद जनता बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's