Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्यात ३६७ नागरिकांची तपासणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी ( दि.१८) तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तज्ञ डॉक्टरांकडून एकूण ३६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सोमवारी (दि.१८) लोहारा ग्रामीण रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. या आरोग्य मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना गटनेत्या सारीका प्रमोद बंगले, राष्ट्रवादी गटनेते जालिंदर कोकणे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, डॉ. महेश पाटील, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, रमाकांत जोशी, डॉ. दिपाली चिंचोळे, डॉ. मनिष सिन्हा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या. सर्व रोग मोफत तपासणी विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली. यात हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदुचे आजार, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचा रोग, गुप्त रोग, कान-नाक, घसा आजार, अस्थिरोग, एच.आय.व्हि. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग आदी आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत रक्त, लघवी, एक्स रे व ई‌.सी.जी. व गरजु रुग्णांना‌ आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. या मेळाव्यात २०८ पुरुष व १५९ स्त्री असे एकूण ३६७ जणांची तपासणी करण्यात आली. \"\"यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, अभिमान खराडे, अदिंनी भाषणे केली. यावेळी शिवसेना युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने मेळाव्यात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमाकांत जोशी व सुत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी तर डॉ. दस्तगीर मुजावर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अभिमान खराडे, न.प.चे अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक अविनाश माळी, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, के.डि.पाटील, बाळासाहेब कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, डॉ. संदिप उपळे, डॉ. इरफान शेख, डॉ. राजु गायकवाड, डॉ. जितेंद्र मेटे, डॉ. दिपाली शिंदे, डॉ. विद्या बनसोडे, उज्वल कारभारी, डॉ. दस्तगीर मुजावर, पल्लवी गायकवाड, खंडु शिंदे, अंगद गिराम, प्रविण कांबळे, आलाबक्ष बागवान, उज्वल कारभारी, तुकाराम गायकवाड, दत्ता बोर्डे , बप्पा वाघमारे, अमोल वाघमारे, एम.जी.सिरसाठ, स्वप्नील कटारे, योगेश गायकवाड, पुजा घोडके, अंजु साळुंखे, वैशाली लोंढे, सुनिता स्वामी, आदिनाथ फुलसुंदर, यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, परिसरातील रुग्ण व नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आरोग्य मेळावाग्रामीण रुग्णालय लोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आय सीड फाउंडेशनच्या वतीने आयोजित भारतीय संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धा संपन्न

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिका बादुले हिचे विभागीय वक्तृत्व स्पर्धेत यश

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिका बादुले हिचे विभागीय वक्तृत्व स्पर्धेत यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!