वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसील कार्यालयास कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावे अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२१) जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तहसिल कार्यालयास कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. मागील चार महिन्यापूर्वी लोहारा तहसीलदार यांची बदली झाल्याने उमरगा येथील नायब तहसिलदार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच एकूण तीन नायब तहसिलदार पैकी एक नायब तहसिलदार प्रतीनियुक्तीवर उस्मानाबाद येथे आहेत. तर दुसरे नायब तहसिलदार मेडिकल रजेवर आहेत. त्यामुळे सध्या फक्त एक नायब तहसिलदार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, दादा पाटील, राहुल जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शैलेश चंदनशिवे आदींच्या सह्या आहेत.