Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात दोन दिवस लसीकरणास चांगला प्रतिसाद

admin by admin
15/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात मंगळवारी व बुधवारी कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी ( दि.१४) तालुक्यातील ६६२ नागरिकांनी लस घेतली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लसीकरण सुरू केले आहे. सध्या तालुक्यात कोविशील्ड व कोवॅक्सीन या दोन लस उपलब्ध आहेत. सध्या तालुक्यात लोहारा, सास्तुर ग्रामीण रुग्णालय तसेच माकणी, कानेगाव, जेवळी, आष्टाकासार प्राथमिक आरोग्य केंद्र व होळी, जेवळी (दक्षिण), दस्तापुर, कास्ती(बु) उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. बुधवारी( दि.१४) तालुक्यातील एकूण ६६२ नागरिकांनी लस घेतली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी लसीबाबत गैरसमज करून घेऊन लस न घेणाऱ्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने लोकांमध्ये जनजागृती करून व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरण सुरू केले आहे. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः लस घेऊन गावातील नागरिकांना लस घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यामुळे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी लसीकरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांची सोय लोकप्रतिनिधी यांनी केली होती.


कोरोना महामारीवर मात करण्यासाठी नियम पाळणे व जास्तीत जास्त लसीकरण करणे हे दोनच उपाय आपल्याकडे आहेत. सर्व विविध प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी यांनी सर्व लोहारा तालुकावासियांना लसीकरण करून घेण्यास सांगावे. दुर्धर आजार असणारे नागरिक व जेष्ठ नागरिक यांना प्राधान्य द्यावे. कारण हे गट अतिजोखमीचे आहेत. आरोग्य विभाग युध्द पातळीवर काम करून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यास सज्ज आहे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या राज्य सरकारने १५ दिवस कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाची ही साखळी ब्रेक व्हावी हा उद्देश आहे. परंतु हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनीही याला प्रतिसाद देऊन अनावश्यक गर्दी करू नये. बुधवारी (दि.१४) रात्री ८ पासून या निर्बंधांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री ८ वाजल्यापासून पोलीस प्रशासनाने कारवाईस सुरुवात केल्याचे दिसून आले. परंतु गुरुवारी सकाळी पोलीस प्रशासन कुठेच दिसून आले नाही.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लसीकरण
Previous Post

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांच्याशी साधला संवाद

Next Post

संचारबंदीत सूट दिलेली दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी दोन यावेळेतच सुरू राहणार – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा आदेश – कडक निर्बंध लागू – उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

संचारबंदीत सूट दिलेली दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी दोन यावेळेतच सुरू राहणार - जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा आदेश - कडक निर्बंध लागू - उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's