Vartadoot
Sunday, June 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात झाली अंतिम कुस्ती

admin by admin
08/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त गुरुवारी ( दि. ८) दुपारी भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. जवळपास २० मिनिटे चाललेली ही कुस्ती निकाली निघत नसल्याने कुस्ती बरोबरीत काढण्यात आली. त्यामुळे बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात आली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा बुधवारी ( दि. ७) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्तीच्या स्पर्धा गुरुवारी (दि. ८) पार पडल्या.

सिद्धेश्वर यात्रा माकणी - कुस्ती दंगल

या स्पर्धेत जवळपास ४०० मल्ल सहभागी झाले होते. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात या स्पर्धा पार पडल्या. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास २० मिनिटे चालली. कुस्ती निकाली निघत नसल्याने ही कुस्ती बरोबरीत काढण्यात आली.

कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महादेव बंडगर, शहाजी आळंगे, अंकुश कोरडे, फुलचंद आळंगे, श्रीकांत जाधव, राम लोभे, अंतोबा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. अंतिम कुस्ती १५ हजारांची होती. ही कुस्ती बरोबरीत निघाल्याने दोन्ही मल्लांना ही रक्कम विभागून देण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कुस्तीसिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

अमर पवार यांनी घेतले एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन

Next Post

उमरगा तालुक्यातील २३ पैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही – सरपंच पदासाठी ६९ तर सदस्य पदासाठी ४९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Related Posts

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी
लोहारा तालुका

मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी

07/06/2026
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
लोहारा तालुका

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी

07/06/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील २३ पैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही - सरपंच पदासाठी ६९ तर सदस्य पदासाठी ४९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's