Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी येथे शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील माकणी येथे आय सीड फाउंडेशनच्या वतीने ‘शैक्षणिक साहित्य संच वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात माकणी, खेड, धानुरी, जुनी माकणी व हराळी या गावातील एकूण गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शैक्षणिक साहित्य संच\’ वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक साहित्य संचामध्ये  स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य ( प्रत्येकी ३ इन १ वही, २०० पानी वही, २०० पानी रजिस्टर, चित्रकला वही, क्रेयॉन्स बॉक्स, स्केच पेन, बॉल पेन, पट्टी, पेन्सिल, रबर, शॉर्पनर कंपास इत्यादीचा) समावेश आहे. त्याचबरोबर आय सीडच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे निवड झालेल्या दिग्विजय कांबळे आणि संजना शिंदे, डिप्लोमा इन कॉम्पुटर इंजिनीअरिंगसाठी शासकीय पॉलिटेक्निक येथे निवड झालेल्या रोहित कांबळे, नीट परीक्षेत ५२० व एच. एस. सी. सीबीएससी मध्ये ९०% गुण मिळविलेल्या राजकन्या पाटील, दहावीत ९२ टक्के घेऊन उत्तीर्ण झालेल्या सृष्टी नामवाड आणि पुणे शहर पोलीसमध्ये यंदा निवड झालेल्या नामदेव कांबळे या गुणवंतांचा ट्रॉफी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

\"माकणी\" \"\"
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तुर येथील निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे होते. यावेळी माकणीचे उपसरपंच फुलचंद आळंगे, सदस्य अनुसया वाघमारे, गोवर्धन आलमले, गोपाळ ढोणे मुसा सय्यद, भीमा कांबळे, समाधान मोरे, बाळासाहेब ओवांडकर, गयाबाई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला मान्यवरांच्या शुभहस्ते पाणी घालून व विद्यार्थ्यांच्या स्वागत समूह गीताने झाली. प्रास्ताविक व आय सीड संस्थेची वाटचाल यावर संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे यांनी मांडणी केली.

\"लोहारा\"
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता त्यांच्या आत्मविश्वास वाढीवर काम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी नादरगे यांनी केले. त्याच बरोबर आय सीड करत असलेल्या कामाचे विशेष कौतुक त्यांनी केले. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थीनी राजकन्या पाटील, संजना शिंदे व  दिग्विजय कांबळे यांनी आपला प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास मनोगताद्वारे मांडला. कार्यक्रमाला आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, बळीराम शिंदे, महादेव धारुळे, शिक्षक सोमनाथ कुसळकर, विजयकुमार नामवाड, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कांबळे, आप्पासाहेब ढोणे, खंडू कांबळे, सतीश वाघमारे, भैरवनाथ वाघमारे, बाबू वाघमारे, शकील सय्यद, वैभव चौरे, निकिता वाघमारे, प्रणव पांचाळ, सविता शिंदे, सुरेखा मिसाळ, पूजा कांबळे, रेखा गायकवाड, काशीनाथ ढोबळे इ. विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर कलशेट्टी यांनी तर संस्थेचे कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

पोलीस पाटील संघाच्या वतीने नूतन तहसीलदारांचा सत्कार

Next Post

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर – मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर - मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!